दहावीच्या विद्यार्थ्यांनो गोंधळून जाऊ नका, इकडे लक्ष द्या...

बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेलं परीक्षेचं स्वरुप यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था 

Updated: Jan 2, 2019, 01:40 PM IST
दहावीच्या विद्यार्थ्यांनो गोंधळून जाऊ नका, इकडे लक्ष द्या...  title=

मुंबई : तुमचा पाल्य यंदा दहावीला असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी... मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दहावीची परीक्षा सुरू होईल. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ही पहिलीच परीक्षा असेल. मात्र त्यामुळेच दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येतेय. विज्ञान आणि गणित विषयाची सर्वाधिक काळजी विद्यार्थ्यांना आहे. यंदा नववीच्या अभ्यासक्रमातले प्रश्न येणार आहेत. तसंच पाठपुस्तकाबाहेरचेही ४ गुणांसाठी प्रश्न येणारेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी तोंडी परीक्षा घेण्यात येणार नाही. म्हणजे शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. 

बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेलं परीक्षेचं स्वरुप यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालीय. बदललेल्या अभ्यासक्रमामुळे निकालावरही परिणाम होण्याची शक्यता शिक्षक आणि पालकांकडून व्यक्त करण्यात येतेय.

या बदललेल्या नियमांची माहिती पालकांनाही देण्याचं काम काही शाळा वेगवेगळ्या कार्यशाळांमधून पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही देण्यात येतेय, असं स्वामी विवेकानं शाळेतील शिक्षक अनिल बोरनारे यांनी दिलीय. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यास हा बदललेला अभ्यासक्रम असल्याचं सांगत त्यांनी या बदलाचं स्वागतच केलंय. कोणताही संभ्रम निर्माण न करता शाळांमधून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय.