मुंबईकरांनो, १०१ आरोग्य चाचण्या केवळ १०० रुपयांत!

यासाठी, ५२ कोटी ३२ लाखांचे कंत्राट 'थायरोकेअर टेक्नॉलॉजिला' देण्यात आलंय

Updated: Jan 2, 2019, 10:04 AM IST
मुंबईकरांनो, १०१ आरोग्य चाचण्या केवळ १०० रुपयांत!  title=

मुंबई : मुंबईकरांसाठी आता कामाची बातमी.. मुंबईकरांना रक्त, लघवीसह मुलभूत अशा १०१ चाचण्या केवळ १०० रुपयांत करता येणार आहेत... तर ३८ प्रगत चाचण्यांसाठी अवघे २०० रुपये मोजावे लागणार आहेत.. मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात, प्रसुतीगृहात या चाचण्या उपलब्ध असतील. यासाठी पालिकंनं दोन कंपन्यांना ४ वर्षांसाठी ८० कोटी रुपयांचं कंत्राट दिलंय. या दोन्ही कंपन्यांच्या प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या होतील.. पश्चिम उपनगर आणि शहरातील दवाखान्यांमधील चाचण्यांसाठी ५२ कोटी ३२ लाखांचे कंत्राट 'थायरोकेअर टेक्नॉलॉजिला' मिळालं आहे. तर, पूर्व उपनगरातील २६ कोटी ८६ लाखांचे मेट्रोपॉलिस हेल्थकेअरला मिळालं आहे. 

मुंबई महापालिका रुग्णांकडून १०१ चाचण्यांसाठी जरी १०० रुपये आकारणार असली तरी महापालिका मात्र, कंटादाराला २२५ रुपये मोजणार आहे. तर ३८ चाचण्यांसाठी पालिका २०० रुपये आकारणार असून पालिका यासाठी ९०० रुपये मोजणार आहे.