चेंबूरमधील ३ दिवसांच्या बाळाच्या आईचा रिपोर्ट निगेटीव्ह

चेंबूर येथील कोरोना बाधित ३ दिवसाच्या मुलाचा आणि आईचा रिपोर्ट निगेटीव्ह 

Updated: Apr 2, 2020, 07:26 PM IST
चेंबूरमधील ३ दिवसांच्या बाळाच्या आईचा रिपोर्ट निगेटीव्ह title=

मुंबई :  चेंबूर येथील कोरोना बाधित ३ दिवसाच्या मुलाचा आणि आईचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. कस्तुरबा रुग्णालयात तिच्या रक्त चाचणीचा अहवाल पाठवण्यात आला होता. ३ दिवसाच्या मुलाला आणि त्याच्या आईला  कोरोना झाल्याचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेनं दिला होता. त्यामुळे त्या दोघांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. 

बाळ आणि आईची पुन्हा दोनदा चाचणी होणार असून १-२ दिवसांत या दोन चाचणी होणार आहेत. याप्रमाणे उर्वरीत रिपोर्टही निगेटिव्ह आल्यास तर खाजगी लॅबच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.

२६ मार्च रोजी प्रसुतीकरता या महिलेला एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रसुती झाल्यानंतर या बाळाला आपल्या मातेसह कोरोना व्हायरसची लागण झालेल्या काही रूग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर या नर्सिंग होममधील रिसेप्शनिस्टला देखील कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं.

त्या बाळाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी दुपारी ११.३० च्या सुमारास त्यांच्या पत्नीचं सिझेरिअन करण्यात आलं. बाळासह माझ्या पत्नीला १२.३० वाजता एका खासगी रूममध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर दुपारी २ वाजता एक नर्स आली आणि त्यांनी हा खासगी रूम खाली करायचा सांगून त्यांना दुसरीकडे ठेवलं. ज्या नर्सने हे सगळं सांगितलं त्या स्वतः कस्तुरबा रूग्णालयात क्वारंटाइन असल्याची धक्कादायक माहिती नंतर समोर आली.

त्यानंतर त्यांना कोणतीही माहिती न देता दुसऱ्या रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. तब्बल २४ तासांनी डॉक्टरांनी त्यांना फोन करून माहिती दिली की,'तो खासगी रूम कोरोनाच्या पेशंटसाठी ठेवण्यात आला होता. आता कोणताही डॉक्टर किंवा नर्स त्या रूममध्ये येणार नाही.' महत्वाची बाब म्हणजे या नर्सिंग होमने ६५ हजार रुपये चार्ज केले होते.

बाळाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार,'रूग्णालयात येण्यापूर्वी माझ्या पत्नीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. आता पत्नीसह माझ्या बाळाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याला जबाबदार कोण? '

पंतप्रधानांनी केलेल्या सूचना 

१. लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी  करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे

२. देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे झाले असे नाही. आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे पर्यटन ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.
 
३. कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता  राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन  वगैरे तंत्रज्ञांचा उपयोग करा.

४.  कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

५. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती , तज्ञ , यांचे टास्क फोर्स तयार करा , त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या

६. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने  संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिध्दही मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

७. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल . पण एकदम सर्व गर्दी होईल ग्रामीण भागात असे ए करू नका. त्याची विभागणी करा . शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी  वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

८. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

९. ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

१०. आयुष्य मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

११. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.