मुंबई : चेंबूरमध्ये मोनोरेल स्टेशनजवळ दोन मोनोरेल एकमेकांच्या समोर आल्या, सुदैवाने मोठा अपघात टळला, यानंतर अर्धातास मोनोरेलची दारं बंद होती, यामुळे प्रवासी घाबरले होते.
अर्ध्या तासानंतर प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं, एका ज्येष्ठ नागरिकाची अवस्था गंभीर झाल्याने त्यांना स्ट्रेचरचा वापर करून बाहेर काढण्यात आलं, यानंतर त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलं.
अत्याधुनिक यंत्रणा असतानाही मोनोरेल एकमेकांसमोर कशा आल्या, या एकमेकांना धडकल्या असत्या, तर काय झालं असतं, मोनोरेल प्रशासन हे गांभीर्याने का घेत नाहीय? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
मोनोरेल प्रशासनाने याविषयी अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.