बारावी निकालानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर

बारावी निकालानंतर विविध महाविद्यालयांत पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. 

Updated: Jun 17, 2019, 09:09 PM IST
बारावी निकालानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर  title=

दिपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : बारावी निकालानंतर विविध महाविद्यालयांत पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. बारावी निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची लगबग सुरु होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील महाविद्यालयांनी आज पहिली गुणवत्ता यादा जाहीर केली.विद्यार्थ्यांना त्या त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरही ही यादी पाहता येणार आहे. त्यापैकी काही महाविद्यालयांच्या कट ऑफवर दृष्टीक्षेप..

मिठीबाई कॉलेज

बी ए - 96 टक्के 
बी कॉम - 89.69 टक्के

बीएमएस 
आर्टस - 91.17 टक्के
कॉमर्स - 95.60 टक्के
सायन्स - 91.67 टक्के

बीएमएम 
आर्टस् - 94.67टक्के
कॉमर्स -93.40 टक्के
सायन्स -92.17 टक्के

बीएएफ ( बॅचलर ऑफ अकौंटिंग अँड फायनान्स)
आर्टस्  -95.20टक्के

रुईया महविद्यालय 

बी ए - 95.8 टक्के 
बी एससी - 86.31 टक्के 

बीएमएम
आर्टस् -93.2 टक्के
कॉमर्स- 90.8 टक्के 
सायन्स - 93.6 टक्के

विल्सन कॉलेज 

बीएमएस
आर्टस्  - 87.7 टक्के
कॉमर्स- 92.4 टक्के
सायन्स- 90 टक्के

बीएमएम
आर्टस् - 93 टक्के
कॉमर्स- 93.6 टक्के
सायन्स - 90.6 टक्के

बी ए - 85 टक्के
बी एससी - 70 टक्के

झेवियर्स महविद्यालय 

बी ए - 92.31 टक्के
बीएससी (आयटी ) - 95 टक्के
बीएससी ( बायलॉजीकल सायन्स )- 77.08 टक्के
बीएमएस -80.13 टक्के
बीएमएम - 81.88

अकरावीची प्रवेश प्रक्रीया रखडली

आजही राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रीया रखडली असून सीबीएसईचे लेखी गुण ग्राह्य धरण्याबाबत शिक्षण विभागाने अंतीम निर्णय घेतलेला नाही. 8 जूनला दहावीचा एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून 9 दिवस उलटले तरी शिक्षण विभागाला तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. राज्यातील 23 लाखहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत असून शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासही यामुळे अधिक विलंब होणार आहे.