सरकार पाच वर्ष चालेल हा मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास - थोरात

31 ऑक्टोबर रोजी राज्यभर काँग्रेसचं प्रत्येक जिल्ह्यात सत्याग्रह

Updated: Oct 26, 2020, 07:26 PM IST
सरकार पाच वर्ष चालेल हा मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास - थोरात

दीपक भातुसे, मुंबई : 'सरकार पाडून दाखवा असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिलंय तो मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालेल हा मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस सत्याग्रह करणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकरी आणि कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात सत्याग्रह केलं जाणार आहे.' अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विजय वड्डेट्टीवार, सुनील केदार हे सगळे वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सत्याग्रह करणार आहेत. यावेळी सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत काँग्रेस नेते आणि मंत्री उपस्थित असणार आहेत.

'कोणीही किती प्रयत्न आणि कारस्थान केली तरी महाराष्ट्राचे ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. तारखा कितीही दिल्या तरी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही.' असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.