मुंबई : देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात होत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही मुंबईत अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंता वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक मोठ्या कंपन्यांचे कार्यालयं असल्याने येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. पण गेल्या ३ महिन्यांपासून कधीही न थांबणारी मुंबई शांत आहे. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे शासनापुढे मोठं आव्हान आहे.
- मुंबईत रूग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन आता 1.81% झाला आहे.
- मुंबईत एच पूर्व येथे रुग्ण दुपटीचा कालावधी 88 दिवसांवर गेला आहे.
- तर एफ उत्तर 82, ई विभागाचा 74, एल विभाग 70 दिवस असा रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी नोंदवला गेला आहे.
एवढेच नाही तर 1 टक्के पेक्षा कमी रूग्ण वाढीचा सरासरी दर नोंदवणारा एच पूर्व यापूर्वी हा पहिला विभाग ठरला होता. आज एच पूर्वचा रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.8 % असा असून एफ उत्तर आणि ई विभागांचा रूग्ण वाढीचा सरासरी दर 0.9% असा झाला आहे. एल विभागातही हा सरासरी दर 1% वर आलेला आहे.
रूग्णवाढीचा सरासरी दर 24 विभागांपैकी 3 विभागात 1% पेक्षा कमी तर 10 विभागांत 2% पेक्षा कमी आहे. या पैकी 8 विभागातील सरासरी दर दीड टक्क्यांपेक्षा (1.5%) कमी आहे.