मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख काही प्रमाणात कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्ण संख्येतही घट होताना दिसत आहे तर कोरोनातून बरं होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या चोवीस तासात 6 हजार 600 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 431 जण बरं होऊन घरी परतले.
राज्यात आतापर्यंत 60 लाख 83 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61टक्के इतकं झालं आहे.
एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना मृत्यूंचा आकडा मात्र वाढताना दिसत असल्याने राज्यासाठी ही चिंताजनक स्थिती आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत एकूण 231 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के इतका आहे.
सध्य राज्यात 4 लाख 79 हजार 553 जण होमक्वारंटाईन आहेत, तर 3 हजार 289 जण संस्थात्मक क्वारंटाईमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या चोवीस तासात 323 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 366 रुग्ण बरं होऊन घरी गेले. आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 15 हजार 880 इतकी झाली आहे. सध्या मुंबईत 5 हजार 82 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी 1 हजार 434 दिवसांवर आला आहे.