राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

 ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 6, 2021, 08:49 PM IST
राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (omicron) मुंबईत शिरकाव झाला आहे. राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 10 वर पोहचला आहे. यामुळे प्रशासन आणि यंत्रणा जागे झाले आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे. (corona new variant omicron maharashtra Environment minister aaditya thackeray and health minister rajesh tope give reaction on restrictions)

राज्यात ८ रुग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज रात्री टास्क फोर्सबरोबर बैठक बोलावलीय. सध्या ही बैठक सुरु आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवी नियमावली लागू करायची का याबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे. दरम्यान सध्या जरी कडक निर्बंधाबाबत शक्यता नसली तरी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हंटलंय.