कोविड-१९ : परदेश प्रवासानंतर सातव्या दिवशी कोरोना चाचणी बंधनकारक

ब्रिटन,  (Britain), युरोप (Europe) आणि आखातातून (Gulf ) आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) (Institutional quarantine) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

Updated: Dec 28, 2020, 08:10 AM IST
कोविड-१९ : परदेश प्रवासानंतर सातव्या दिवशी कोरोना चाचणी बंधनकारक
संग्रहित छाया

मुंबई : ब्रिटन,  (Britain), युरोप (Europe) आणि आखातातून (Gulf ) आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) (Institutional quarantine) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची कोरोना चाचणी (Corona test) प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र पालिका आयुक्तांनी रविवारी परिपत्रक काढून याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

ब्रिटन, लंडनहून आलेल्या कोरोना ( coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे.  त्यामुळे मुंबई पालिका आयुक्तांनी खबरदारी म्हणून आता सात दिवसानंतर कोरोना टेस्ट बंधनकारक केली आहे . ब्रिटनहून (Britain) परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतात पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत एकही प्रवासी पॉझिटिव्ह (Corona positive) नसला तरी महिनाभरात ब्रिटनहून परतलेल्या सगळ्या प्रवाशांची होणार कोरोना टेस्ट होणार आहे.

मुंबईत रविवारपासून ब्रिटनहून तब्बल ५९१ पेक्षा जास्त नागरिक परतले आहेत. मात्र आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळलेला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या प्रवाशांमध्ये मुंबईतील १८७ आणि  राज्यातील १६७ तर परराज्यातल्या २३६ प्रवाशांचा समावेश आहे. यातील २९९ जणांना हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर इतर राज्यांतील प्रवासी दुसऱ्या विमानाने आपापल्या राज्यात परतले आहेत.

दरम्यान, ब्रिटनहून भारतात रविवारपासून परतलेले तब्बल २० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये थैमान घातलेल्या नव्या कोरोनाची दहशत भारतातही पसरली आहे. लंडनहून दिल्लीत परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर गेली आहे. त्यापाठोपाठ अमृतसरमध्ये आठ जण, अहमदाबादेत पाच जण तर चेन्नईत आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे ब्रिटनहून परतेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.