कोरोनाबाधितांना ग्रामपंचायतीसाठी करता येणार मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) आता कोरोनाबाधिताला आता मतदान करता (Corona victims can vote for Gram Panchayat) येणार आहे. 

Updated: Jan 13, 2021, 06:50 PM IST
कोरोनाबाधितांना ग्रामपंचायतीसाठी करता येणार मतदान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) आता कोरोनाबाधिताला आता मतदान करता (Corona victims can vote for Gram Panchayat) येणार आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. कोविड बाधित मतदारांना मतदान (Voting for Covid affected voters) समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त (Maharashtra Election Commissioner) यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली. 

बाधित आणि विलगीकरण कक्षातल्या व्यक्ती, तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. 

सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. आदल्या दिवशी मतदान केंद्र आणि साहित्य सॅनिटाईज करणार. थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था केलीय. मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असेल तर पुन्हा तापमान घेणार. तेच तापमान आलं तर मतदाराला टोकन देणार. मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी त्याला मतदानाला बोलावले जाणार आहे. 

मदान यांनी सांगितले की, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यात आता मतदानाच्या दृष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी 3.00 पर्यंत मतदानाची वेळ असेल.

कोविड बाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी 7.30 पासून मतदान करता येईल. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. 

एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत, असेही मदान यांनी सांगितले.