मुंबईतील शाळा 18 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता

आता लवकरच मुंबईतल्या (Mumbai) शाळांची (School) घंटा वाजणार आहे.  

Updated: Jan 13, 2021, 05:38 PM IST
मुंबईतील शाळा 18 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : आता लवकरच मुंबईतल्या (Mumbai) शाळांची (School) घंटा वाजणार आहे. मुंबईतील शाळा 18 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत आहेत. प्रथम नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, याबाबतचा निर्णय हा 15 जानेवारीपर्यंत अपेक्षित आहे. लसीकरण (Corona vaccination) मोहिमेनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत (Education Department )आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

कोरोनामुळे सध्या शाळांचे वर्ग हे ऑनलाईन भरत आहेत. मात्र, आता लवकरच मुंबईतल्या शाळेची घंटा वाजणार आहे. 18 जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्ग भरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 15 जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर 8 तारखेपासून शाळा सुरू होण्याची शक्यता वाढल्याचे पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

निर्णय झाल्यावर सर्व शाळा एकाच दिवशी सुरू होणार आहेत. मार्चपासून बंद असलेल्या शाळा क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. अशा शाळाही आता अभ्यासासाठी सज्ज झाल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत चाचपणी सुरु झाली आहे.