शेतकरी बांधवांनो अशी कोणतीही बातमी 'झी २४ तास'ने दिलेली नाही...

कापसाच्या भावाविषयी सोशल मीडियावर तर्कवितर्क बांधले जात आहेत. यासाठी झी २४ तास सारख्या

Updated: Dec 29, 2021, 10:22 PM IST
शेतकरी बांधवांनो अशी कोणतीही बातमी 'झी २४ तास'ने दिलेली नाही... title=

मुंबई  : कापूस या पिकाला या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत चांगला भाव मिळतोय. त्यामुळे कापसाच्या भावाविषयी सोशल मीडियावर तर्कवितर्क बांधले जात आहेत. यासाठी झी २४ तास सारख्या नामांकित संस्थेच्या नावाने फोटो मॉर्फ करुन चुकीची माहिती पसरवली जात आहे. 'झी २४ तास'ने कापूस १० हजार रुपये प्रति क्विंटल होणार, अशी बातमी आतापर्यंत दिलेली नाही. खालील फोटोत दिसत असलेली बातमी 'झी २४ तास'ने कधीही प्रसारीत केलेली नाही. 

कापूस पिकाच्या भावाविषयी कुणीतरी गैरसमज पसरवण्यासाठी खालील फोटो मॉर्फ केला आहे. झी २४ तासच्या नावाने कुणीतरी ही चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. 

हा फोटो शेअर करणाऱ्यांच्याविरोधात 'झी २४ तास' कायदेशीर कारवाई करण्याचं पाऊल उचलणार आहे. तरी प्रेक्षकांना विनंती आहे की, असा फोटो फॉवर्ड करु नका, तसेच या फोटोवरील चुकीची माहितीवर विश्वास ठेवू नका, कारण ही चुकीची माहिती 'झी २४ तास'ने दिलेली नाही.

शेतकरी बांधवांची दिशाभूल व्हायला नको म्हणून ही माहिती देत आहोत, शेतकरी बांधवांनी ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी ही विनंती.