वरळी- प्रभादेवीमध्ये शिवसेनेत असंतोषाचं वातावरण

वरळी- प्रभादेवीमध्ये शिवसेनेत असंतोषाचं वातावरण दिसून येत आहे.

Updated: Oct 8, 2017, 08:41 PM IST
वरळी- प्रभादेवीमध्ये शिवसेनेत असंतोषाचं वातावरण

मुंबई : मुंबईतल्या वरळी आणि प्रभादेवीमध्ये शिवसेनेत असंतोषाचं वातावरण नर्माण झालं आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. 

यात शाखाप्रमुख नियुक्त्यांवरुन पदाधिकारी नाराज असल्याचं समजतंय. युवा शिवसैनिकांनी देखील आता पदांची मागणी करण्यास सुरूवात केली आहे.

शेखर भगत हे त्यांपैकीच एक आहेत. यामध्ये विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्यावर रोष आहे. त्यामुळे इच्छुकांनी आमदार सुनील शिंदेंकडे धाव घेतलीय. 

नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. विभाग क्रमांक ११ मध्ये फेरबदलामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे. 

मात्र या वाद लवकरच मिटण्याची चिन्हं असल्याचं काही शिवसैनिकांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ शिवसैनिक आणि युवा शिवसैनिक यांच्यात पदांवरून हा वाद रंगला आहे.