Dabbu Ji Ka Dance | डब्बू अंकलचा आता या हिरोच्या गाण्यावर धमाल डान्स

सोशल मीडियावर डब्बू अंकलने पुन्हा एकदा धमाल केली आहे. संजीव श्रीवास्तव एक नवं गाणं घेऊन पुन्हा परतले आहेत.

Updated: Aug 27, 2018, 02:02 PM IST

मुंबई : सोशल मीडियावर डब्बू अंकलने पुन्हा एकदा धमाल केली आहे. संजीव श्रीवास्तव एक नवं गाणं घेऊन पुन्हा परतले आहेत. संजीव श्रीवास्तव यांनी यापूर्वी गोविंदाच्या गाण्यावर डान्स केला होता. आपल्या पहिल्याच डान्समध्ये डब्बू अंकलने धमाल केली होती, फेसबूक आणि व्हॉटसअॅपवर डब्बू अंकलचीच चर्चा होती. पण यावेळेस डब्बू अंकलने गोविंदाच्या गाण्यावर नाही तर, मिथुन चक्रवर्तीच्या एका गाण्यावर डान्स केला आहे. (बातमीत ्व्हिडीओ पाहा)

डब्बू अंकलचा आणखी एक डान्स

डब्बू अंकलचा हा व्हीडीओ यूट्यूबवर २.५० लाखाच्या वर गेला आहे. मिथून चक्रवर्तीच्या 'जूली जूली, जॉनी का दिल तूम पे आय जूली, या गाण्यावर डब्बू अंकलने डान्स केला आहे, आणि तो पुन्हा लोकप्रिय झाला आहे. या गाण्याचे ंसंगीतकार अनू मलिक आहेत तर गायक कविता कृष्णमूर्ती आणि अनू मलिक आहेत. जिते है शान से या सिनेमातील हे गाणं आहे. इंदिवर यांनी हे गीत लिहिलंय.

ओरिजनल व्हिडीओ पाहा

डब्बू अंकलने यापूर्वी महानायक राजकपूर यांच्या जन्मदिवशी 'मेरा नाम जोकर' या सिनेमातील, जिना यहाँ, मरना यहाँ, या गाण्यावर डान्स केला आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. डब्बू अंकलचा पहिला व्हिडीओ 'खुदगर्ज' सिनेमाचं गाणं 'मय से मीना से ना साकी से' पर आया था. या गाण्याला सर्वसामान्य लोकांनी खूप पसंत केलं. यात डब्बू अंकलसोबत गोविंदा आणि सलमान खानने देखील डान्स केला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x