Devendra Fadanvis: झी न्यूजचा एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम मुंबईत पार पडतोय.भारतात विविधता असली तर राष्ट्रीयतेच्या भावनेत एकता आहे. राज्य आणि केंद्रामधील विविध विषयांवरील संवाद वाढवणे हा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झी न्यूजच्या कार्यक्रमाला राजधानी दिल्लीतून सुरुवात झाली. त्यानंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हा कार्यक्रम होतोय. या मंचावरुन राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध विषयावंर चर्चा होत आहेत. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.
महाराष्ट्र सरकार पूर्णपणे वक्फ संशोधन बिलाचे समर्थन करते. वक्फमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे बिल आहे. यामुळे कोणावर अन्याय होत नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी वक्फच्या जमिनी खाल्ल्या. संस्था सुरु केल्या. हा मोठा घोटाळा काँग्रेसने केला. आता ते घोटाळा करु शकत नाही. त्यांना मुस्लिमांच्या हक्काशी काही देणंघेणं नाही. त्यांची खरचं काळजी असती तर 1 टक्के तरी सुधार आणला असता. सर्वसामान्य मुस्लिमांना या संशोधनाबद्दल माहिती नाही. त्यावर नेते राजकीय पोळी भाजतायत, अशी टिप्पणी फडणवीसांनी केली.
जिथे अपक्षांचे सरकार असतात तिथे केंद्राकडून सहकार्य मिळत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलतना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या योजनांचा लाभ सर्वजण घेतात. केंद्र सरकार नेहमी नीतीचे निर्णय घेतले. व्यक्तीगत निर्णय घेतले नाही.
राजकारणात बदल्याला स्थान नाही. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का आहेत? याचे उत्तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे देतील. इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतरही वारसा सुप्रिया सुळेंना मिळेल हे अजित पवारांच्या लक्षात आले. तसेच शिवसेनेचा वारसा आदित्य ठाकरेंकडे गेले. त्यांच्याकडे वारसा जाण्यासाठी मोठ्या नेत्यांचे पंख कापले गेले. एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यासोबत हे झालं. खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी युती केली. यामुळे हिंदुत्वासोबत प्रतारणा झाली. पार्टी तुटल्या त्या अंतर्गत संघर्षामुळे तुटल्या, असे ते म्हणाले.
अजित पवारांमुळे नुकसान झालं असं मी म्हणणार नाही. पण अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली. शिवसेनेसोबत युती करताना हिंदुत्वाचा धागा होता. लोकसभेत त्यांनी आपली मते चिन्हित केली पण काही प्रमाणात ट्रान्सफर केली. मी अजित पवारांची माफी मागून सांगतो, ज्या परिवारवादी पार्टी आहेत, त्यांना सीमा असतात.
अजित पवार यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले. अनेक राष्ट्रवादींच्या नेत्यांवर आरोप केले. मी अजित पवारांनी कोअर आयडॉलॉजी सोडली नाही. पण काही अंशी आम्हाला अपेक्षित भूमिका स्वीकारली आहे. विधानसभा निकालात जास्त फरक दिसणार नाही.
स्ट्राइक रेटने सर्वकाही ठरत नाही. हे खूप महत्वपूर्ण नाही. आम्ही 3 टक्क्यांहून कमीने हरलोय. आमची ताकद कमी झाली नाहीय. त्यांना 2 लाख मते जास्त मिळाली. 2 गोष्टी या निवडणुकीत पाहायला मिळाल्या. हे संविधान बदलतील असे नॅरेटीव्ह चालवण्यात आले. आम्ही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. यामुळे एससी, एसटी प्रवर्गात मते ट्रान्सफर झाली. निवडणूकीत वोट जिहाद पाहायला मिळाला, असे ते म्हणाले.
कोणाला जिंकवण्यासाठी नव्हे तर हरवण्यासाठी मत देणं हा जिहाद आहे. हे धर्माच्या आधारे केलं जातं.धार्मिक स्थळांवरुन इकोसिस्टिम चालवली जात होती. द्वेश, धर्माच्या आधारे लोकांना भडकवले जात होते.
भारत जोडोला सहकार्य करणारे एक इकोसिस्टिम आहे. जे पद्धतशीरपणे काम करते. असदुद्दीन ओवेसींचे वेगळे इकोसिस्टिम आहे. ते द्वेशाचे राजकारण करतात.
नितेश राणे हे कट्टर हिंदुत्वादी आमदार आहे. पार्टी हिंदुत्ववादी आहे. आम्ही काँग्रेस नाही. सकल हिंदु संघटनेसोबत ते हिंदु जागरणाचे काम करतात. त्यांच्या काही विधानाचे समर्थन मी करत नाही. जिथे चुकीचे विधान झाले तिथे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत एफआयआर दाखल केली. असं विधान आल्यावर त्यावर इकोसिस्टम तयार होते. पण हिंदुविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होत नाही. नितेश राणेंवर आम्ही २ वेळा एफआयआर केली. आम्ही कायद्याने काम करतो. आम्ही त्यांना हिंदुत्वाबद्दल बोलण्यापासून रोखू शकणार नाही.
अक्षय शिंदेच्या मृत्यूला एन्काऊंटर म्हणणं चुकीचं आहे. फेक एन्काऊंटरवर आम्ही विश्वास ठेवत नाही. कोर्ट काय म्हणत हे महत्वाचं नाही. कोर्ट काय लिहितं याला महत्वाचं आहे. एन्काऊंटरसंदर्भात कोर्टाने असं काही लिहिलं नाही. मी पोस्टर्सचे समर्थन करत नाही. उत्तर प्रदेशकडून प्रेरणा घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. ठोको नीतीची गोष्ट प्रेरणा घेण्यासारखी नाही. महाराष्ट्र खूप पुढे आहे.
डेव्हलपमेंट योजनेसोबत सामाजिक योजनादेखील आणाव्या लागतात. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह यांनी ही योजना खूप छान पद्धतीने राबवली. आम्ही त्यांच्याशी बोललो आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने राबवली. कोणतीही योजना चालली तर ती मुख्यमंत्र्यांच्या नावानेच चालेल, असे ते म्हणाले.
विधानसभेसाठी पार्टी जे सांगेल ते काम करेन. पार्टी म्हणाली तुमचं काम झालंय नागपूरला जा, तर नागपूरला जा, असे फडणवीस म्हणाले.