लालबागच्या राजाच्या दानपेटीत सापडल्या हजाराच्या ११० जुन्या नोटा

येत्या दोन महिन्यात नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण  होणार आहे.

Updated: Sep 9, 2017, 03:50 PM IST
लालबागच्या राजाच्या दानपेटीत सापडल्या  हजाराच्या ११० जुन्या नोटा  title=

 मुंबई : येत्या दोन महिन्यात नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण  होणार आहे.

सरकारने दिलेल्या वेळेत अनेकांनी जुन्या नोटा परत दिल्या नाही.

अनेकांच्या घरी असलेला काळापैसा त्यांनी गणेशोत्सवात दान पेटीत टाकला आहे. लालबागच्या राजाच्या दानपेटीतही अशा जुन्या ५०० आणि १०००च्या नोटा सापडल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दानपेटीत ५ कोटी ८० लाखांचे दान आले आहे. त्यापैकी १ लाख १० हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा आहेत. 

 दरवर्षी प्रमाणे यंदाही लालबागच्या राजाला  सोन्या -चांदीच्या वस्तूंचे दान झाले. त्यासोबतच जी रोख रक्कम दान पेटीत पडली त्यातही अनेकांनी त्याच्याजवळील काळा पैसा दान करण्याची संधी साधली. दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजाराच्या ११० जुन्या नोटा सापडल्या आहेत.