भाजपच्या ३ ते ४ मोठ्या नेत्यांशी चर्चा - जयंत पाटील

भाजपचे अनेक नेते संपर्कात असल्याचा जयंत पाटील यांचा दावा

Updated: Oct 21, 2020, 01:51 PM IST
भाजपच्या ३ ते ४ मोठ्या नेत्यांशी चर्चा - जयंत पाटील

मुंबई : एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपचे ३ ते ४ मोठे नेते राष्ट्रवादीत येण्याची शक्यता आहे. माझे आठ ते दहा दिवसात भाजपच्या तीन ते चार मोठ्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. तेही पक्षात यायला उत्सुक आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

सरकार पाच वर्षापेक्षा जास्त काळ चालेल. खडसेंबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. यात आमदारही आहेत पण कोरोना असल्याने आता त्यांना घेऊन निवडणूक लागू नये अशी आमची भूमिका आहे. त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत अशी माहिती देखील जयंत पाटील यांनी दिली आहे.

खडसेंवर भाजपात होणारा अन्याय अनेक लोकांनी पाहिला आहे. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.