मुंबई : मुंबईत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कान-नाक-घशाचे रूग्ण 50 टक्क्यांनी वाढले आहेत. महिन्याला 40 ते 50 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये रोज किमान 30 ते 40 रूग्ण कान-नाक-घशाच्या तक्रारी घेऊन येत आहेत.
कोरोनाचा परिणाम श्रवणशक्तीवरही होऊ शकतो. त्यामुळे, वेळीच उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. तर, लहान मुलं आणि प्रौढांना याचा अधिक त्रास होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे सर्दी, खोकला आहे. याचा थेट परिणाम तुमच्या नाक, कान आणि घशावर होतो. मात्र कोरोनाकाळात अनेकजण डॉक्टरकडे जाणं टाळत होते. किंवा अनेक डॉक्टरही कान, नाक आणि घशाचे रूग्ण तपासत नव्हते. त्यामुळे याचा परिणाम कालांतराने दिसत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोकं वर गेलं आहे. संपूर्ण जग पुन्हा ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटने स्तब्ध झालं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लक्षणे थोडी वेगळी आहेत. ती जाणून घेणे महत्वाची आहेत. ही लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशन (सामा) च्या प्रमुख अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, गेल्या 10 दिवसांत त्यांनी 30 रुग्णांना कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार, ओमायक्रॉनने संक्रमित पाहिले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात. शरीराचे तापमान वाढते. त्याची लक्षणे कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा खूपच वेगळी आहेत.
अँजेलिक कोएत्झी म्हणाल्या की, तिने आतापर्यंत पाहिलेले सर्व रुग्ण लसीकरण केलेले नव्हते. त्यांना ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे होती. मला वाटते की युरोपमधील मोठ्या संख्येने लोक या प्रकाराने संक्रमित आहेत. आतापर्यंत ओमायक्रॉनची लागण झालेले आढळून आलेले बहुतेक रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.