एलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना :रक्तदात्याची गरज - मुंबई पोलिसांचे ट्विटरवरून आवाहन

आजची मुंबईकरांची सुरूवात एल्फिस्टन दुर्घटनेच्या बातमीने झाली आहे. 

Updated: Sep 29, 2017, 02:31 PM IST
एलफिन्स्टन स्टेशन दुर्घटना :रक्तदात्याची गरज - मुंबई पोलिसांचे ट्विटरवरून आवाहन   title=

मुंबई : आजची मुंबईकरांची सुरूवात एल्फिस्टन दुर्घटनेच्या बातमीने झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे तसेच अफवांमुळे परेल आणि एल्फिस्टन यांना जोडणारा ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली आहे. या दुर्घटनेमध्ये २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर ३५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 

जखमींवर केईएम रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. एल्फिस्टन दुर्घटनेची तीव्रता भयंकर असल्याने रूग्णालयात रक्ताची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना रक्तदान करण्याचे आवहन करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे.

 

कोणत्या रक्तदात्यांची आहे गरज ? 
ए निगेटीव्ह,बी निगेटीव्ह आणि एबी निगेटीव्ह रक्तगटाच्या लोकांनी तात्काळ केईएम रूग्णालयात रक्तदान पोहचावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x