बनावट भारतीय चलन प्रकरणी फरार आरोपीस 35 वर्षांनी बेड्या

आरोपीला तब्बल 35 वर्षानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे . 

Updated: Sep 18, 2019, 09:30 PM IST
बनावट भारतीय चलन प्रकरणी फरार आरोपीस 35 वर्षांनी बेड्या  title=

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : बनावट भारतीय चलन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व जामिनावर सुटलेल्या आणि जामिनावर सुटून फरार झालेल्या आरोपीला तब्बल 35 वर्षानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे . मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 9 च्या टिम ने खरा ठरविला आहे. 'कानून के हाथ लंबे होते है' हे चित्रपटातील वाक्य मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने खरं करून दाखवलं आहे. 

1985 साली मुंबईतील सहार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बनावट भारतीय चलनी नोटांचे वितरण करण्याच्या तयारीत असलेल्या अकरा जणांच्या टोळीला अटक करण्यात आलेली होती. त्या टोळी मधला एक इब्राहिम कल्लू मन्सूरी हा आरोपी जामिनावर सुटल्यानंतर फरार झाला होता. 

बनावट नोटांच्या गुन्ह्या संदर्भात गेली 35 वर्ष हा आरोपी फरार असल्यामुळे त्याचा शोध सुरू होता. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेल्या कारवाईत गुजरात मधील टोकायरी येथील बदरापूर येथुन अटक केली आहे.

आरोपी इब्राहिम हा फरार झाला होता. त्यावेळी 28 वर्षांचा होता मात्र तब्बल 35 वर्षांनंतर  63 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीला फेरअटकेसाठी पुन्हा सहार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.