मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल (paras porwal) यांनी चिंचपोकळी येथील आपल्या राहत्या घरी बाल्कनीतून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. मुंबईच्या काळाचौकी परिसरात राहणारे पारस पोरवाल हे नाव बांधकाम क्षेत्रातील मोठं नाव आहे. 57 वर्षीय पारस पोरवाल हे एक मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
A Mumbai-based real estate developer, Paras Porwal died by suicide after he jumped from the 23rd floor of a building. Mumbai's Kalachowki police station registers case. Body sent for post-mortem, suicide note found, further probe on: Mumbai Police
— ANI (@ANI) October 20, 2022
पारस पोरवाल यांच्या जिममधून पोलिसांना सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. माझ्या मृत्यूला मी स्वत: जबाबदार असल्याचे त्यात लिहिले आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरवाल यांनी चिंचपोकळी रेल्वे स्थानकाजवळील शांती कमल हाऊसिंग सोसायटीमधील त्यांच्या घरातील जिममध्ये सकाळी 6 वाजता बाल्कनीतून उडी मारली. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पारस पोरवालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. पोलीस कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रांची चौकशी करत आहेत.