मुंबई : फास्टॅग लावूनही मुंबईच्या वेशीवरच्या टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय...त्यामुळे 'फास्टॅग' हा 'स्लो टॅग' ठरत असल्याची प्रतिक्रीया कवी संदीप खरेने व्यक्त केलीय. सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून संदीप खरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत फास्टॅग स्कॅन होत नसल्याने टोल आणि दंड अशी रक्कम भरायला सांगितल्याने संदीप खरे संतप्त झालेत.
फास्टॅगसक्तीबाबत (Fastag) महत्वाची बातमी. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी फास्टॅगला (Fastag) पुन्हा मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे तुमच्या वाहनावर फास्टॅग स्टिकर नसेल तर त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. देशातील सर्वच महामार्गांवर वाहनचालकांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे.
मुंबईकरांना (Mumbai) मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वेशींवर फास्टॅगसक्ती महिन्याभरानंतर करण्यात येणार आहे. इतरत्र आजपासून अंमलबजावणी होणार आहे. जर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.
राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत नागपूर विभागाच्या अखत्यारीत साधारण 25 टोल नाके , तर मुंबई विभागातील 22 टोल नाक्यांवर फास्टॅगची अंमलबजावणी होईल. देशात टॅगच्या वापराचे प्रमाण साधारण 80 टक्के असून महाराष्ट्रात ते 70 ते 75 टक्के आहे. मात्र, आजपासून ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. मुंबईच्या वेशींवर मात्र फास्टॅगसक्ती लांबणीवर गेली आहे. आता महिनाभरात फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी होऊ शकेल.