close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लव्ह मॅरेज केल्याने गर्भवती तरुणीची बापाकडूनच हत्या

मिनाक्षी गरोदर असल्याचे ही शवविच्छेदनात समोर आले आहे.

Updated: Jul 15, 2019, 09:04 PM IST
लव्ह मॅरेज केल्याने गर्भवती तरुणीची बापाकडूनच हत्या

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मीनाक्षी चौरसिया य़ा तरुणीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे. या मुलीचा खून तिच्याच वडिलांनी केल्याचे उघड झालं आहे. आपल्या मर्जी विरोधात लग्न केल्याने वडिलांच्या मनात राग होता. २४ तासाच्या आत पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तरुणीची हत्या झाली होती.

घाटकोपरच्या नारायण नगर येथे लाल बहादूर शास्त्री मार्गावर काल सकाळी 7 वाजताच्या दरम्यान एक महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सदर महिला ही 20 वर्षीय मिनाक्षी चौरसिया असून ती नारायण नगर विभागात राहणारी आहे असे कळाले. मात्र तिची हत्या कधी आणि कोणी केली याबाबत तपास सुरू झाला. पोलिसांची चक्रे फिरू लागली मात्र तपासात धागा सापडत नव्हता. मात्र संशयाची सुई ही तिच्या नातेवाईकांवर जात हाती. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सख्या मुलीची हत्या तिच्या जन्मदात्या बापाने केल्याचे उघड झाले. पोलिसांनी राजकुमार चौरसिया यांना अटक केली आहे. 

मीनाक्षीच्या वडिलांनी मिनाक्षीचे लग्न ठरवले होते. मात्र त्यास नकार देत मीनाक्षी घरातून पळून गेली. मीनाक्षीने वडिलांच्या विरोधात जावून ब्रिजेश चौरसियासोबत मागील वर्षी लग्न केले होते. मिनाक्षीच्या पतीचे पानांचे दुकान आहे. दोघेही एक मेकांच्या प्रेमात होते. मात्र त्यांच्या लग्नाला मीनाक्षीच्या वडिलांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही पळून गेले आणि मीनाक्षी वयाने सजाण झाल्यावर दोघांनी लग्न केले. मिनाक्षी गरोदर असल्याचे ही शवविच्छेदनात उघड झाले. या दरम्यान वडील आणि मीनाक्षीच्या सासरच्या लोकांसोबत संबंध सुधारले होते. मात्र वडिलांच्या डोक्यात राग हा कायम होता. यावरूनच तुला पैसे आणि कपडे घेऊन देतो सांगून बाहेर बोलावले आणि तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे पोटच्या पोरीची हत्या केली.

पोटच्या मुलीची हत्या करून बापाच्या नात्यावर काळीमा फासणाऱ्या ह्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर कायद्याने शिक्षा ही होईल मात्र ह्या मानसिकते बद्धल चा प्रश्न कायम राहणार आहे.