तुम्ही देखील स्वस्तातलं खाद्यतेल घेतलंय ? धक्कादायक वास्तव समोर

स्वस्तातल्या खाद्यतेलांवर शंका उपस्थित 

Updated: Feb 3, 2021, 09:20 AM IST
तुम्ही देखील स्वस्तातलं खाद्यतेल घेतलंय ? धक्कादायक वास्तव समोर   title=

मुंबई : तुम्ही खाता ते खाद्यतेल भेसळयुक्त आहे का ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. त्यामागचं कारणंही तसंच आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आलंय. त्यानंतर नागरिकांना मोठा धक्का बसलाय. या प्रकारानंतर वापरत असलेल्या स्वस्तातल्या खाद्यतेलांवर शंका उपस्थित झालीय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने याप्रकरणी कारवाई केलीय. 

एफडीएने केलेल्या कारवाईत खाद्यतेलात ५० टक्के तेल भेसळयुक्त असल्याचं उघड झालंय. याप्रकरणी आठ उत्पादकांवर कारवाई करण्यात आलीय. तर 4 कोटी 98 लाख रुपयांचा तेलसाठा जप्त करण्यात आलाय. 

शेंगदाणा, मोहरी, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, पामोलिन अशा तेलांच्या 93 नमुन्यांपैकी 49 नमुने भेसळयुक्त असल्याचं कारवाईतून स्पष्ट झालंय. मुंबईनंतर इतर शहरांमध्येही अन्न आणि औषध प्रशासन कारवाई करणार आहे. 

नामवंत कंपन्यांच्या तुलनेत हे तेल खूपच स्वस्त असते. त्यामुळे या तेलाला ग्राहकांची खूप मागणी असते. पण आता हे तेल भेसळयुक्त असल्याचे उघड झाल्याने ग्राहकांची भांबेरी उडालीय.