वरळीतील साधना इमारतीला आग, अग्नीशमनच्या 12 गाड्या घटनास्थळी

वरळीतील साधना हाऊस इमारतीला आग लागल्याचेही समोर येत आहे. महिंद्रा टॉवरच्या मागे ही इमारत आहे.

Updated: Dec 29, 2018, 06:50 PM IST
वरळीतील साधना इमारतीला आग, अग्नीशमनच्या 12 गाड्या घटनास्थळी  title=

मुंबई : मुंबईतील आगीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. परवाच चेंबुरच्या टिळकनगरमधील 15 मजली सरगम इमारतीला आग लागली होती. यामध्ये 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला 2 दिवस पूर्ण होत नसताना आणखी एक घटना समोर आली आहे. वरळीतील साधना हाऊस इमारतीला आग लागल्याचेही समोर येत आहे. महिंद्रा टॉवरच्या मागे ही इमारत आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज दिवसभरातील आगीची ही तिसरी घटना आहे. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानीचे कोणतेही वृत्त आले नाही आहे.