मुंबई : अकरावीच्या ऑनलाईन अॅडमिशनचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचं दिसतंय. यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापही सहन करावा लागतोय.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रीया १६ जूनपासून म्हणजेच आजपासून सुरु होणार असल्याचे शिक्षण उपसंचालक विभागातून जाहीर करण्यात आले.
त्यानुसार मुंबईतील शाळांनी ऑनलाइन अर्ज भरुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले. पण अद्याप शिक्षण विभागाकडून ऑनलाइन अर्जच वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला नाही.
वेबसाईटवर प्रवेशाचा अर्ज कधी अपलोड करण्यात येईल, याबाबत कोणतीही सूचना वेबसाइटवर देण्यात आलेली नाही. त्यामुळे, आज पहिल्याच दिवशी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ होणार अशीच चिन्ह आहेत.