अबू सालेमच्या आयुष्यातील ५ "भयानक" किस्से

'कॅप्टन' या नावाला एकेकाळी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री घाबरत असे तो अबू सालेम आता जेलमध्ये कैद आहे. अबू सालेमने दहशतीच्या नावाखाली आलिशान जीवन जगला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 8, 2017, 12:34 PM IST
अबू सालेमच्या आयुष्यातील ५ "भयानक" किस्से title=

मुंबई : 'कॅप्टन' या नावाला एकेकाळी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री घाबरत असे तो अबू सालेम आता जेलमध्ये कैद आहे. अबू सालेमने दहशतीच्या नावाखाली आलिशान जीवन जगला आहे. 

अशा या अबू सालेमच्या जीवनातील काही रोमांचक किस्से खूपच थरारक आहेत. हे किस्से आहेत हुसेन जैदी यांच्या 'अबू सालेम बोल रहा हूँ' या पुस्तकातील आहेत. 

हा होता अबू सालेमचा पहिला शिकार होता हा बिल्डर : 

मुंबईतील बिल्डर प्रदीप जैन हा अबूचे पहिले शिकार होता. प्रदीपच्या भावाकडून अबूने कोलडोंगरीतील प्रॉपर्टी सोडण्याचा किंवा जीवे मरण्याची धमकी दिली होती. ही धमकी गांभिर्याने न घेतल्यामुळे प्रदीप जैनला अतिशय महागात पडलं होतं. ७ मार्च १९९५ साली सालेमचा शूटर सलीम हड्डीने प्रदीप जैनला त्याच्याच कार्यालयात घुसून मारलं होतं. त्याच्या १३ व्या दिवशी पत्नीला फोन करून सांगतो की, मला प्रदीपच्या भावांनी पैसे दिले नाहीत तर सगळ्यांना मारून टाकेन. प्रदीप ऐकला असता तर आज तो जिवंत असता. 

संगीत सम्राट गुलशन कुमारची हत्या : 

अबू सालेम याने संगीत सम्राट गुलशन कुमारची हत्या करून घेतली होती. सालेमने गुलशन कुमारला प्रत्येक महिन्यात ५ लाख रूपये देण्यास सांगितले होते. तेव्हा त्याला उत्तर मिळालं होतं की, एवढे पैसे देऊन मी वैष्णव देवीच्या मंदिरात भंडारा करेन. याचा राग म्हणून अगदी तात्काळ सालेमने शूटर राजाच्या मदतीने दिवसाढवळ्या गुलशन कुमार यांची हत्या केली. एवढंच काय तर ही हत्या करताना शूटर राजाने आपला फोन १० ते १५ मिनिटे सुरूच ठेवला होता जेणे करून गुलशन कुमारचा आवाज सालेम ऐकेल. 

Hello, मी कॅप्टन बोलतोय : 

Hello, मी कॅप्टन बोलतोय..... गुलशन कुमारच्या हत्येनंतर अबू सालेमने बॉलिवूडला घाबरवण्याचं काम सुरू केलं. यानंतर बॉलिवूडकरांना घाबरवताना सालेम "कॅप्टन" या नावाचा उल्लेख करत असे. मुंबई पोलिसांनी फोन कॉल रेकॉर्ड करायला सुरूवात केल्यामुळे सालेमने हे कोड नाव स्विकारलं होतं. एवढंच काय तर सालेम बॉलिवूडकरांना आर्सलान नावाने देखील भेटत असे. 

अबू सालेमचा संजय दत्तसोबत "याराना"

१९९२ वर्ष संपता संपता अनेक सांप्रदायिक दंगली सुरू झाले. सुनील दत्त यांच्या घरी अनेकांना मदत मिळाली. त्यावेळी सुनील दत्त यांच्या कारवर हल्ला झाला आणि संजय दत्तला आपल्या घराची काळजी जाणवू लागली. त्यावेळी संजयने हनीफ कडावाला आणि समीर हिंगोरा या दोन प्रोड्युसरची मदत घेतली.तेव्हा असं ठरलं की अबू सालेम या दोघांसोबत संजय दत्तच्या घरी बंदूक आणि हत्यार घेऊन जाणार. अबू सालेम हा संजय दत्तला आपला रोल मॉडेल मानत असे. 

मोनिका बेदी, सालेमची प्रियकर : 

पंजाबमध्ये जन्मलेल्या मोनिका बेदीने ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीमधून इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला होता. यानंतर ती मुंबईत डान्स शिकू लागली. सिनेमाकडे तिची ओढ वाढत असताना मुकेश दुग्गल याचा 'सुरक्षा' हा सिनेमा तिने साईन केला. दुग्गल सुरूवातीपासून सालेमच्या जवळचा मानला जात होता. तेव्हा दुबईच्या एका पार्टील सालेम- मोनिकाची ओळख झाली. तेथूनच हे प्रेम प्रकरण सुरू झालं.