close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

‘टेक गणेशा’ स्पर्धा ठरणार टेक्नोप्रेमींसाठी सुवर्णसंधी

गणेश भक्तांसाठी खास 

‘टेक गणेशा’ स्पर्धा ठरणार टेक्नोप्रेमींसाठी सुवर्णसंधी

मुंबई : बुद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे औचित्य साधून यावर्षी 'ई कीडा' या शैक्षणिक संस्थेने 'टेक गणेशा' या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीत तंत्रज्ञानाचा सर्जनशीलपणे वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रवेश घेण्यासाठी स्पर्धकांना 'ई किडा' (E Keeda) हे अँप डाउनलोड करावे लागणार असून प्रवेशिका फक्त १८ सप्टेंबर रात्री ११:५९ वाजेपर्यंतच स्वीकारल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सर्वाधिक मतं  मिळवणाऱ्या  स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात येणार आहे.

 टेक्नॉलॉजी - शाप की वरदान ? 

 टेक्नॉलॉजीमुळे भारत महासत्ता बनतोय?

टेक्नॉलॉजीचा वापर करून केलेला देखावा

हे तीन मुख्य विषय सजावटीसाठी देण्यात आले आहेत. या स्पर्धेत प्रथम विजेत्या ठरणाऱ्या कलाकृतीला ९,९९९ रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. तर द्वितीय येणाऱ्या स्पर्धकाला सन्मानचिन्हासह ७,७७७ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे  तृतीय बक्षीस म्हणून सन्मानचिन्ह व ५,५५५ रुपये देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर उत्तेजनार्थ ठरलेल्या ३ स्पर्धकांना  प्रशस्तीपत्रही देण्यात येणार आहे.सर्वसामान्यांच्या जीवनात तंत्रज्ञानाची वाढती गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या कलात्मक बुद्धीला वाव मिळावा यासाठी 'इ किडा' ने ही स्पर्धा आयोजित केली आहे. अधिक माहितीकरिता ई किडाशी ९०२९००६४६४ या दूरध्वनी क्रमांकांमार्फत संपर्क साधता येणार आहे.  

‘ई किडा’ ही शैक्षणिक संस्था इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रास्त दरात उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. तंत्रज्ञानप्रेमींसाठी ही सुवर्णसंधीच ठरेल. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन 'ई किडा'[ तर्फे करण्यात आले आहे.