Lalbaugcha Raja 2022 : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठी बातमी

Ganeshotsav 2022 : दरवर्षाप्रमाणे यंदाही भक्तमंडळींनी लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja 2022) दर्शनासाठी तुफान गर्दी केलीय. 

Updated: Sep 3, 2022, 10:11 PM IST
Lalbaugcha Raja 2022 : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठी बातमी title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : राज्यात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2022) जल्लोष पहायला मिळतोय. गणेशोत्सवाचा आजचा (3 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. कोकणासह राज्यभरात आज सर्वत्र गौराईचंही आगमन होतंय. त्यामुळे भाविकांचा आनंद द्विगुणीत झालाय.  कोरोनाच्या 2 वर्षानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातोय. अनेक गणेशभक्त मुंबईतील गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. दरवर्षाप्रमाणे यावर्षीही भक्तमंडळींनी लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja 2022) दर्शनासाठी तुफान गर्दी केलीय. (ganeshotsav 2022 mumbai railway police appealed to devotees who comed lalbaugcha raja ganpati darshan)

काही भाविक हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला नवस करण्यासाठी येतात. तर काही भक्त हे मुखदर्शनासाठी येतात. या भाविकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसाांकडून (Mumbai Railway Police) लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाांसाठी आवाहन करण्यात आलंय.

लोहमार्ग पोलिसांचं आवाहन 

"ज्या भाविकांना नवासाकरता जायचंय त्यांनी मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानकावर उतरावे. त्यानंतर पूर्वेला बाहेर पडावं. जेणेकरुन भक्तांना नवसाच्या रांगेत लवकर जाता येईल", असं आवाहन हे नवस करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना करण्यात आलंय. 

"तसेच मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी चिंचपोकळी रेल्वे स्थानकावर उतरावे. त्यानंतर सीएसएमटीच्या दिशेने असलेल्या पूलाचा वापर करुन पूर्वेला बाहेर पडावं. तसेच भायखळा स्टेशनला उतरून पूर्वेला बाहेर पडावं. त्यामुळे भाविकांना मुखदर्शनाच्या रांगेत लवकर पोहचता येईल", असंही आवाहन केलं गेलंय. 

दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होतो. सोबतच एकच गर्दी होते. भाविकांना रांगेत तासंतास उभं रहावं लागतं. भाविकांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच त्यांना त्रास होऊ नये, याची खबरदारी घेत पोलिसांनी हे नियोजन केलंय. तसेच पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनेचं नागरिकांनी पालन करावं, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय.