close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इरकली साडीपासून तयार करण्यात आलेल्या मखरांची सोशल मीडियावर चर्चा

गणपती बाप्पांसाठी इको-फ्रेंडली मखर

Updated: Aug 19, 2019, 02:36 PM IST
इरकली साडीपासून तयार करण्यात आलेल्या मखरांची सोशल मीडियावर चर्चा

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : सध्या सोशल मीडियावर इरकली साडीपासून तयार करण्यात आलेलं मखर चांगलेच चर्चेत आहेत, मराठमोळ्या युवकाने ऑनलाईन बिझनेस थाटत इकोफ्रेंडली मखराचा नवा पर्याय आणला आहे. कमर्शिअल आर्टिस्ट असलेला संदेश गावकर गेल्या चार वर्षापासून सर्वांगी या बॅनरखाली पर्यावरणपूरक देखावे तयार करतो आहे. त्यात त्याची पत्नी श्रद्धा आणि आईवडील यांचाही मोठा हातभार लागलेला आहे. पारंपरिक साडी आणि चोळीपासून देखावे तयार करण्याची संकल्पना त्याने प्रत्यक्षात आणली आहे.

अवघ्या पाच मिनिटांमध्ये हा देखावा उभारता येतो. त्यामुळे भाविकांना आणि गणेश उत्सव eco-friendly पद्धतीने साजरा करू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी एक नवा पर्याय समोर आलेला आहे. तीन हजारात हे देखावे उपलब्ध आहेत. सध्या ठाण्यामध्ये हे कुटुंब मखर तयार करतं आणि विशेष म्हणजे ऑनलाईन देखील हे मखर उपलब्ध करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातूनच नाही तर परदेशातही याला मागणी आहे.

ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा अनेक ठिकाणी या मखरांना विशेष मागणी आहे. इरकली साडीपासून चार ते पाच फुटाचा लोखोटा तयार केला असून त्यावर सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची अशा पद्धतीची शब्दांचे सुलेखन केले आहे. त्यामुळे एक वेगळे पण याला प्राप्त झालं आहे. 

मखराच्या वरच्या बाजूला बांबूपासून बनवलेली छत्री आहे. बाप्पांच्या मुर्तीच्या दोन्ही बाजूला ठेवण्यासाठी चोळी मणी आणि लटकन याचा वापर करून आकर्षक लोड तयार केले आहेत.