close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गोवंडीत नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

जखमी अवस्थेत मोहसीन शेख यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं

Updated: Apr 25, 2019, 12:49 PM IST
गोवंडीत नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

गोवंडी, मुंबई : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच गोवंडीत हिंसक वळण लागलंय. गोवंडीतल्या स्थानिक नगरसेविकेच्या पतीवर रात्री हल्ला झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसीन शेख कार्यालयाबाहेर फोनवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यावर तीन ते चार जणांनी हत्यारांसह हल्ला केला. त्यात मोहसीन गंभीर जखमी झालेत.

जखमी अवस्थेत मोहसीन शेख यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

हल्ला करणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. परंतु, हा हल्ला राजकीय वैरातून की पूर्ववैमनस्यातून होता? याचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत.