गुजरात दंगल : ATS ची मोठी कारवाई, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड ताब्यात

गुजरात एटीएसच्या पथकाने (Gujrat Ats) शनिवारी तिस्ता सेटलवाडला (Teesta Setalvad) ताब्यात घेतले आहे.

Updated: Jun 25, 2022, 07:12 PM IST
गुजरात दंगल : ATS ची मोठी कारवाई, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड ताब्यात  title=

मुंबई : गुजरात एटीएसच्या पथकाने (Gujrat Ats) शनिवारी तिस्ता सेटलवाडला (Teesta Setalvad) ताब्यात घेतले आहे. सामाजिक कार्यकर्त्या सेटलवाड  यांना त्यांच्या एनजीओशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने तिस्ता यांना मुंबईतील राहत्या घरातून ताब्यात घेतलं आणि सांताक्रूझ पोलीस स्टेशन गाठलं. (gujarat ats detained and took activist teesta setalvad to santacruz police station in mumbai)

अमित शाह यांच्याकडून गंभीर आरोप

सेटलवाड यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या एनजीओने गुजरात दंगलीबाबत निराधार माहिती दिल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगावला होता. सर्वोच्च न्यायालयाने 2002 दंगलीतील एका प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निर्दोष मुक्ततेविरोधात दाखल करण्यात आलेली अपिल शुक्रवारी  फेटाळून लावली.
 
"मी निकाल काळजीपूर्वक वाचला आहे. तिस्ता सेटलवाड यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांनी चालवलेल्या एनजीओ - मला त्या एनजीओचे नाव आठवत नाही. या एनजीओने पोलिसांना दंगलीची निराधार माहिती दिली होती", असं अमित शाह म्हणाले होते.

क्लीन चिट कायम

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हिंसाचारात मारले गेलेले काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांचे अपील फेटाळले.

न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एसआयटीने 2012 मध्ये दिलेली क्लीन चिट कायम ठेवली. क्लिन चीट कायम ठेवताना या खटल्यातील सहकारी याचिकाकर्ते सेटलवाड यांनी झाकिया जाफरी यांच्या भावनांचा गैरवापर केल्याचंही सर्वोच्च न्यायलयाने स्पष्ट केलं.