नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते. शहरातली दारुची दुकानं आणि बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
आता महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर दारुबंदी हटवण्यात आलीय. अर्थात, परवानाधारक दारुची दुकानंच सुरू ठेवता येणार आहेत. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय.
वाढते अपघात लक्षात घेता, सुप्रीम कोर्टानं डिसेंबर २०१५ मध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या आणि पाचशे मीटर परिघातल्या दारुच्या दुकानांवर बंदी घालण्यात आली होती. आता या आदेशात सुधारणा करण्यात आलीय.