'रुको जरा, सबर करो' डायलॉगमुळे प्रसिद्ध हिंदुस्थानी भाऊ नक्की आहे तरी कोण?

आज मुंबईत एकच खळबळ माजवणारा हा हिंदुस्थानी भाऊ नक्की आहे तरी कोण?

Updated: Jan 31, 2022, 07:24 PM IST
'रुको जरा, सबर करो' डायलॉगमुळे प्रसिद्ध हिंदुस्थानी भाऊ नक्की आहे तरी कोण? title=

मुंबई : रुको जरा सबर करो हा डायलॉग तुम्ही अनेक मीम्समध्ये किंवा व्हिडीओमध्ये पाहिला असेल. या एका डायलॉगने हिंदुस्थानी भाऊला तुफान प्रसिद्धी मिळाली. मात्र आज पुन्हा एकदा हिंदुस्थानी भाऊ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेवर केलेलं वक्तव्य आणि विद्यार्थ्यांना चिथावणीखोर मेसेज करून आंदोलन घडवून आणल्याचा दावा करण्यात आला आहे. 

हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव विकास पाठक आहे. ‘पहले फुर्सत में निकल’ असं म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा ‘बिग बॉस 13’मध्ये झळकला होता आहे. ‘हिंदुस्थानी भाऊ’ या नावाने यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध आहे. 

देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्थानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतो. त्याचे युट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मराठमोळा बबलू उर्फ विकास जयराम पाठक हा जन्माने मुंबईकर आहे. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचं ‘हिंदुस्थानी भाऊ’ असं नामकरण झालं. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वात त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती . विकासने वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून 35 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीमुळे तो सहस्पर्धकांच्याही पसंतीस उतरला होता.

लहान वयातच विकासवर घरची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यामुळे शिक्षण अर्धवट होऊ शकलं. 7 वी पर्यंत शिकता आलं त्यानंतर वडिलांची नोकरी सुटल्यामुळे सुरुवातीच्या काळात खार जिमखान्यात 20 रुपये प्रतिदिन म्हणून बॉलबॉयची पहिली नोकरी त्याने धरली. 

त्याने बारमध्ये वेटर म्हणून काम केलं. लोकलमध्ये आणि दारोदार जाऊन अगरबत्त्याही विकल्या. चायनीजच्या गाडीवरही त्याने काम केलं. साईबाबांचा तो भक्त आहे. साईबाबांसोबत संजूबाबाही त्याला आवडतो. संजय दत्त हा विकासचा आवडता अभिनेता. संजय दत्ताची स्टाईल भाऊच्या (Youtube Sensation Hindustani Bhau) व्हिडीओंमधून दिसून येतं. 

पैसा असो किंवा प्रसिद्धी दोन्ही बाबतीत हिंदुस्थानी भाऊ सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. आज हिंदुस्तानी भाऊची हवा सोशल मीडियावर आहे. इतकच नाही तर मीम्समध्ये त्याची वाढती क्रेझही पाहायला मिळत आहे. लाखो तरुण आज त्याला फॉलो करत आहेत.