महाराष्ट्राच्या IIMC अॅल्युमिनाईट मेळाव्यात, मुंबईत विपिन ध्यानी यांना जाहिरात क्षेत्रातला इफ्को ईमका अवॉर्ड

आयआयएमसी अॅल्युनिनाईट असोसिएशनच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या वार्षिक मीट कनेक्शन्सचं आयोजन मुंबईतील प्रेस क्लबमध्ये करण्यात आलं.

Jaywant Patil Updated: Mar 15, 2018, 09:14 PM IST
महाराष्ट्राच्या IIMC अॅल्युमिनाईट मेळाव्यात, मुंबईत विपिन ध्यानी यांना जाहिरात क्षेत्रातला इफ्को ईमका अवॉर्ड title=

मुंबई : आयआयएमसी अॅल्युनिनाईट असोसिएशनच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या वार्षिक मीट कनेक्शन्सचं आयोजन मुंबईतील प्रेस क्लबमध्ये करण्यात आलं, त्यात गुंजचे संस्थापक आणि मॅगसेस पुरस्कार विजेता अंशु गुप्ता यांनी, थॉटशॉप अॅडव्हर्टाझिंगचे संस्थापक विपीन ध्यानी यांना जाहिरात कॅटेगरीचा इफ्को ईमका अवॉर्ड प्रदान केला.

अवार्डसोबत एक ट्रॉफी, २१ हजार रूपयाचा चेक, सॅमसंग गॅलेक्सी टॅबलेट आणि प्रमाणपत्र सोपवण्यात आलं. आयआयएमसी अॅल्युमिनाई असोसिएशन (ईमका) या वर्षी देशातील १४ शहरांशिवाय, सिंगापूर आणि ताश्कंदमध्येही वार्षिक मेळाव्याचं आयोजन करणार आहे.

कनेक्शन्स मुंबईमध्ये केंद्र सरकारचे प्रिमियर मास कॉम संस्थान आयआयएमसीच्या जवळ-जवळ ७० अॅल्युमिनाईट सामिल झाले. समारोहाचं अध्यक्षस्थान ईमकाचे महाराष्ट्र चॅप्टरच्या अध्यक्षा गायत्री श्रीवास्तव यांनी भूषवलं. चॅप्टर सरचिटणीस देवीदत्त त्रिपाठी यांनी कार्यक्रमाचं संचालन केलं.

मुंबई मेळाव्याला संबोधित करताना, ट्युबरकुलोसिस सर्व्हायव्हर नंदिता व्यंकटेशन यांनी आपल्या आजारपणातील संघर्षाच्या आठवणी सांगितल्या. या आजाराशी लढणाऱ्या दुसऱ्या लोकांना जागरूक करण्याचं वचन दिलं.

श्रीदेवीला देण्यात आली श्रद्धांजली

कामिनी सिंहने श्रीदेवीच्या गाण्यांवर डान्सकरून, श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मुंबईचे डीसीपी वीरेंद्र मिश्रा, मध्य प्रदेश भाजपाचे प्रवक्ते आणि ईमकाचे प्रदेश अध्यक्ष अनिल सौमित्र, वरिष्ठ पत्रकार सौरभ सिन्हा, नीरज वाजपेयी, ब्रिजेश मिश्रा, पीयुष पांडे, विपाशना, रश्मी चव्हाण, अमृत झा, ईमका सरचिटणीस मिहिर रंजन, कोषाध्यक्ष दीक्षा सक्सेना, कर्नाटक संघटक सचिव चैतन्या कृष्णराजू, संस्थापक सदस्य हर्षेंद्र सिंह वर्धन, गौरव दीक्षित, अनिमेष विश्वास, रितेश वर्मा, आनंद सौरभ, वरिष्ठ जनसंपर्क प्रोफेशनल्स ब्रज किशोर, सौरव मिश्रा, मिथुन रॉयसह मोठ्या संख्येने आयआयएमसीच्या माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. संस्थेशी संबंधित काही महत्वाच्या आठवणींना उजाळा दिला, सोनम सैनी यांनी आभार प्रदर्शन केलं.

इम्काचा पुढचा मेळावा

दिल्लीत १८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या इम्को कनेक्शन्सनुसार, देश विदेशातील वेग-वेगळ्या शहरातील, आयआयएमसीचे माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी दरवर्षी भेटतात. दिल्ली आणि ओऱिसाच्या ढेंकनालनंतर, मुंबईत या वर्षी तिसरा मेळावा होता.

इम्काचा पुढचे ३ मेळावे असे असणार आहेत,  १७ मार्च हैदराबादला, तर १८ मार्चला जयपूरला आणि अहमदाबादला आणि, २२ एप्रिल रोजी चंदीगडमध्ये या वर्षीचा शेवटचा ईमका कनेक्शन्स आयोजित करण्यात आला आहे, पण त्या आधी पहिल्या १५ शहरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं आयोजन होईल.