मुंबई : राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात कानपूरमध्ये राहणाऱ्या हर्षिता श्रीवास्तव हिचं नाव पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. हर्षिताचा पती अरविंद श्रीवास्तव हा राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनवल्या जाणाऱ्या पॉर्नोग्राफी फिल्मचं डिस्ट्रीब्यूशन करत होता.
मुंबई पोलिसांच्या तपासानंतर हर्षिताचं बँक अकाऊंट ताब्यात घेण्यात आलं. या तपासात हर्षिताच्या अकाऊंटमध्ये जवळपास अडीच कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे.
हर्षिता कोणतंही काम करत नसल्याचं चौकशीत उघड झाले आहे. पण राज कुंद्राची कंपनी सुरू झाल्याच्या 100 दिवसातच ती करोडपती बनली.
राज कुंद्रामुळे 100 दिवसात महिला करोडपती
पोलिसांची टीम सध्या हर्षिताचा पती अरविंद श्रीवास्तव याचा शोध घेत आहे. अरविंद राज कुंद्राची कंपनी फ्लीज
मूव्हीजच्या कमाईचा काही हिस्सा पत्नी हर्षिता आणि वडील नरवडा यांच्या बँक अकाऊंटमध्ये डिपोजिट करत होता. केवळ 100 दिवसांत हर्षिता लक्षाधीश झाली असल्याचे तिच्या बँक अकाऊंट डिटेलमध्ये समोर आले आहे.
हर्षिताचा पगार म्हणून पैसे बँक खात्यावर जमा
पहिल्यांदा चॅनल फ्लीज ओपीसी प्रायव्हेट लिमिटेडकडून अरविंदची पत्नी हर्षिताच्या खात्यात 40 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यानंतर अरविंदने 100 दिवसात पत्नीच्या खात्यावर तब्बल 2.15 कोटी रुपये ट्रान्सफर केले. हर्षिताचा पगार म्हणून हे पैसे जमा केले जात होते.