एनआयएसाठी 'मोस्ट वॉ़न्टेड' अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक

इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2018, 07:17 PM IST
एनआयएसाठी 'मोस्ट वॉ़न्टेड' अब्दुल मुश्ताक कुरेशीला अटक title=

मुंबई : मुंबईतील २००६ रेल्वे ब़ॉम्बस्फोटाचा आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संस्थेचा सभासद असलेल्या अब्दुल मुश्ताक कुरेशीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दरम्यान या दहशतवाद्यावर NIA ने ४ लाखांचे बक्षीस ठेवलं होतं. तर इंटरपोलने सुद्धा कुरेशीविरोधात विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती.

अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट

अब्दुल कुरेशी हा बॉम्ब बनविण्यात एक्स्पर्ट आहे.  मुंबईत शिक्षण आणि काहीकाळ नोकरी केल्यानंतर मीरा रोड येथे स्थायिक झालेला अब्दुल कुरेशीचे सिमीसोबत संबंध होते. 

कुठलाही संबंध नाही - कुरेशीचे वडील

मात्र त्याचा दहशतवादी घडामोडींशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा अब्दुल कुरेशीचे वडील मुश्ताक कुरेशी यांनी केलाय.  अब्दुल कुरेशी याच्या अटकेबद्दल आपल्याला कुठलीही माहिती नसून पोलिसांनी सुद्धा आपल्याला या बाबत कळवलं नसल्याचं त्यांचं  म्हणणंय.