मुंबई : २९ सप्टेंबर २०२० ला आणखी २ कंपन्यांचे आयपीओ (Initial public offer) मार्केटमध्ये येणार आहेत. यामध्ये UTI Asset management आणि Mazagaon Dock यांचा समावेश आहे. हे IPO २९ सप्टेंबर २०२० ते १ ऑक्टोबर २०२० पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी असणार आहे.
UTI Asset management ने IPO साठी प्राईस बँड ५५२ ते ५५४ रुपये प्रति शेअर ठरवली आहे. एंकर गुंतवणूकदारांसाठी बोली २८ सप्टेंबरला उघडणार आहे. UTI Asset management च्या माहितीनुसार, IPO पासून २१४० कोटी मिळवले जातील.
दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा IPO देखील येत आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईस बँड १३५ ते १४५ रुपये प्रति शेअर ठेवली आहे.
Nippon लाईफ इंडिया एसेट मॅनेंजमेंट आणि HDFC एएमसीनंतर यूटीआय एएमसी शेअर बाजारात येणारी तिसरी AMC असेल. यूटीआय एएमएसीच्या IPO नुसार शेयरहोल्डरर्सदवारे ३,८९,८७,०८१ इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
भारतीय स्टेट बँक, जीवन बीमा निगम आणि बँक ऑफ बडौदा प्रत्येक आयपीओसाठी १,०४,५९,९४९ शेअर्स सादर करेल. पंजाब नॅशनल बँक आणि टीरो प्राईस इंटरनॅशनल दोघे ३८,०३,६१७ शेअर्सची विक्री करेल.
सध्या SBI, LIC, PNB आणि बँक ऑफ बडौदा प्रत्येकाची यूटीआय AMC मध्ये १८.२४ टक्के भागीदारी आहे. अमेरिकेच्या टीरो प्राईसकडे कंपनीची २६ टक्के भागीदार आहे. कंपनीने आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी २ लाख शेअर्स ठेवले आहेत.
Mazagaon Dock च्या माहितीनुसार, IPO मध्ये ३,०५.९९.०१७ शेअर्सची विक्री केली जाईल. आयपीएओ १ ऑक्टोबरला बंद होईल.
कंपनीने शेअर्सला BSE आणि NSE मध्ये लिस्टींग करण्याचा प्रस्ताव आहे. Yes सेक्योरिटीज, Axis कॅपिटल, एडलवाइस फायनँशियल, IDFC सेक्योरिटीज आणि जेएम फायनँशियल आईपीओचं व्यवस्थापन करेल.