'भगवान श्रीराम हे बहुजनांचे, मांसाहारही करायचे' जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेची (Ayodhya Ram Mandir) जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सागर कुलकर्णी | Updated: Jan 3, 2024, 06:50 PM IST
'भगवान श्रीराम हे बहुजनांचे, मांसाहारही करायचे' जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान title=

Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात  (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा अलौकिक, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय करण्यासाठी उत्तर प्रदेशमधलं योगी सरकार (Yogi Government) जोरदार तयारी करतंय. संपूर्ण देशात राममय वातावरण तयार झालंय. देशभरातील रामभक्तांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. पण काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राम मंदिराच्या आडून भाजप धर्माचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. 

आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. भगवान श्रीराम हा बहुजनांचा, राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. प्रभू राम हे शिकार करून मासांहार करायचे असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

एक काळ असा होता तुमची ईद तर आमची दिवाळी होती आता आपण जातो का मुसलमानाच्या घरात. गणेश उत्सव मिरवणूक शांततेत व्हायची आता मात्र गणेश उत्सवात नाचत असताना जर रस्त्यात एखादी म्हशी लागली की असं काय अंगामध्ये संचारत मला काय कळत नाही. परंतु मुसलमानांना माझी विनंती आहे तुम्ही शांत रहा आपण जर काही ॲक्शन केली तर आपोआप त्याला रिएक्शन ही येत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगड येथे जे भाषण केलं हे अजिबात पटणार नाही मुख्यमंत्री असं बोलू शकत नाहीत त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो मला असं वाटतंय की त्यांच्या तोंडामध्ये ती स्क्रिप्ट कोणीतरी घातली असावी. एकनाथ शिंदे हे केवळ एकनाथ शिंदे नाही तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका
2019 चे बंड केल्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही एनसीपी ची सगळ्यात मोठी चूक होती. जिथे जिथे संधी मिळाली तिथे साहेबांचा अपमान केला अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शरद पवार तुम्ही यांचे परतीचे दरवाजे बंद करा. ते तुमच्यावर बोलतील. तर एक मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल.  ते तुमच्या वयाबद्दल बोलतात. दिलीप वळसे पाटील या वयात काय  VT ते आंबेगाव marathon धावणार आहेत का? असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. 

मला आश्चर्य वाटतं तटकरे यांचं मला सोडून मुलीला पालकमंत्री केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की तुला रायगड पालकमंत्री पद द्यायच होतं. पण अजित पवार यांच्यामुळे शक्य झालं नाही. 2019 च्या बंडात सर्वात मोठा हात सुनील तटकरे यांचा होता. तुम्ही हे घर फोडलं. तुमच्या घराची काय स्थिती आहे? तुमच्या सख्ख्या बहीण भावात काय होतंय? तुम्ही जे पेराल तेच उगवेल अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.