मुंबईतील हा महत्वाचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी 12 दिवस राहणार बंद

Jogeshwari Vikhroli Link Road : आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. घराबाहेर पडताना ही बातमी जाणून घ्या. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल बंद राहणार आहे.  

Updated: May 8, 2022, 08:53 AM IST
मुंबईतील हा महत्वाचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी 12 दिवस राहणार बंद  title=

मुंबई : Jogeshwari Vikhroli Link Road : आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. घराबाहेर पडताना ही बातमी जाणून घ्या. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल 12 दिवस बंद राहणार आहे. जोगेश्वरी (पश्चिम) मधील लिंक रोडला पूर्वेकडील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) ला पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) वर जोडणारा हा उड्डाणपूल आहे.  

 जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाण पुलाच्या विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम 13 ते 24 मे दरम्यान केले जाणार आहे. या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. यादरम्यान वाहतूक वळविण्यात येणार असून रस्त्यावर कोंडी होण्याची शक्यता आहे. पण, या काळात उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरु राहणार आहे.

पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील उड्डाणपुलावरून पश्चिम ते पूर्वेकडे प्रवास करता येतो. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी मिळून हा उड्डाणपूल बांधला आहे. वाहतुकीसाठी चांगला पर्याय असलेल्या या उड्डान पुलाची डागडुगी करण्यात येणार आहे.