मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटे यांची अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळण्यात आलीये. कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराला एक महिना पूर्ण होत आलाय तरीही आरोपी मोकाटच बघायला मिळत आहेत.
मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. पुणे सत्र न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय. त्यावर आज सुनावणी होणार होती. त्यानुसार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. मात्र, त्यांनी या प्रकरणाची सुनावणी आपल्या समोर घेणं योग्य ठरणार नसल्याचं सांगत सुनावणीस नकार दिला.
Justice Bhushan Gavai has recused himself from hearing Anticipatory Bail Application of accused Milind Ekbote in #BhimaKoregaonViolence case
— ANI (@ANI) January 31, 2018
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दंगलीचे सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र एकबोटे आणि भिडे या दोघांवर अजून कुठलीच कारवाई झालेली नाही. विरोधी पक्षांकडूनही हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करण्यात आले.