मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची माहिती आता एसएमएसवर

आता बातमी तुमच्या कामाची.. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता एक नवी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Jan 31, 2018, 11:06 AM IST
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची माहिती आता एसएमएसवर title=

मुंबई : आता बातमी तुमच्या कामाची.. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता एक नवी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

एसएमएसवर माहिती

शनिवारी आणि रविवारी प्रवशांना रस्त्यावरच्या वाहतूकीची विद्यमान स्थिती एसएमएसवर मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना घरातून निघण्याआधीच वाहतुकीची स्थिती समजू शकेल. महामार्ग पोलीस यासंदर्भातल्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर ही सुविधा सुरु करणार आहेत. 

विशेष यंत्रणा बसवली जाईल

त्यासाठी वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांवर विशेष यंत्रणा बसवली जाईल. जेणेकरून वाहन चालकांना वाहतूक कोंडीविषयी तातडीनं माहिती देण्यात येईल. क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून ही स्वयंचलित यंत्रणा कार्याविन्त करण्यात येणार असल्याचं MSRDC च्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.