कंगना रानौत प्रकरण : गृहमंत्र्यांना सतत धमकीचे फोन

कंगनाचे राज्याच्या गृहमंत्र्यांना पुन्हा खुले आव्हान

Updated: Sep 9, 2020, 08:11 AM IST
कंगना रानौत प्रकरण : गृहमंत्र्यांना सतत धमकीचे फोन  title=

मुंबई : कंगना रानौत प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सतत धमकीचे फोन येत आहे. अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून हे धमकीचे फोन येत आहे. कंगना रानौत प्रकरणात दिवसेंदिवस नव नव्या गोष्टी समोर येत आहे.

'कंगना रानौत से दूर रहो, ये बात समझ लो, तुमने गलत किया है, अभि भी संभल जाओ नही तो...' अशा धमकीचे सतत फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांना येत आहे. मंगळवारी दिवसभरात अनिल देशमुख यांना ७ धमकीचे फोन आल्याची माहिती मिळाली आहे.  आज पहाटेही दोन धमकीचे फोन येऊन गेले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून अनिल देशमुख यांना फोनवरुन धमकीचे सत्र सुरूच आहे. 

कंगना रौनातने मुंबई आणि मुंबई पोलिसांचा अवमान केला आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. अभिनेत्री कंगना आपल्या बेजबाबदार विधानातून महाराष्ट्र,मुंबई व मुंबई पोलिसांचा अवमान करत असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले. अशा महाराष्ट्राचा जर कोणी अवमान केला तर राज्यातील जनता कधीही सहन करणार नाही, असं अनिल देशमुख यावेळी बोलले. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतचा काही संबंध आहे का, याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचे सांगितले आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगना रनौतने ट्विट केले आहे. आपली ड्रग्ज चाचणी करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु आणि कायमची मुंबई सोडू, असे तिने म्हटले आहे.