शरद पवारांविरोधात पोस्ट करणं केतकीला भोवलं, 18 मे पर्यंत पोलीस कोठडी

ठाणे कोर्टाचे न्यायाधीश वी. वी. राव -जडेजा यांच्यासमोर केतकी केसची सुनावणी झाली.  

Updated: May 15, 2022, 03:36 PM IST
 शरद पवारांविरोधात पोस्ट करणं केतकीला भोवलं, 18 मे पर्यंत पोलीस कोठडी title=

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. शनिवारी केतकीला अटक करण्यात आली. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे केतकीला शरद पवारांविरोधात पोस्ट करणं महागात पडलं आहे. 

ठाणे कोर्टाचे न्यायाधीश वी. वी. राव -जडेजा यांच्यासमोर केतकी केसची सुनावणी झाली. केतकी चितळे हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी केतकी हिने केलेल्या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

केतकी हिने वकील घेतला नाही. तिने स्वतः कोर्टात युक्तिवाद केला.  तर, ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. यावेळी न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

केतकीनं पोस्टमध्ये काय लिहिलं? 

 

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर  मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन  फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l  तू तर लबाडांचा लबाड ll
हे शब्द तिनं पोस्टमध्ये लिहित त्याचं श्रेय अॅडव्होकेट नितीन भावे यांना दिलं.