खडसेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता, जितेंद्र आव्हाड नाराज असल्याची चर्चा

राष्ट्रवादी काही अंतर्गत बदल होण्याची शक्यता...

Updated: Oct 23, 2020, 03:54 PM IST
खडसेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता, जितेंद्र आव्हाड नाराज असल्याची चर्चा

मुंबई : भाजपला रामराम केल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये एकनाथ खडसेंना मंत्रीपद मिळू शकतं. त्यामुळे राष्ट्रवादीमधील एकाला मंत्रिपदाचा त्याग करावा लागणार आहे. राष्ट्रवादीत यानंतर जबाबदारी देखील वाटप होणार आहे. ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मंत्रिपद जात असल्याने आव्हाड नाराज असल्याची चर्चा आहे.

एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ खडसेंना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. सध्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण खाते आहे. जयंत पाटील यांच्याकडे असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद हे जितेंद्र आव्हाड यांना दिले जावू शकते. आव्हाड यांनी काही वेळेपूर्वीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

आज एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. त्यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.