किरीट सोमय्या यांना राणांना भेटायला जाण्याची गरज नव्हती; दिलीप वळसे पाटील

राज्यात काही घटकांकडून जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सुरूये. परंतू पोलीस पूर्ण सक्षमपणे परिस्थिती नियंत्रणात ठेवतील असा मला विश्वास असल्याचं, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

Updated: Apr 24, 2022, 11:16 AM IST
किरीट सोमय्या यांना राणांना भेटायला जाण्याची गरज नव्हती; दिलीप वळसे पाटील title=

मुंबई : राज्यात काही घटकांकडून जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सुरूये. परंतू पोलीस पूर्ण सक्षमपणे परिस्थिती नियंत्रणात ठेवतील असा मला विश्वास असल्याचं, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

राणा दाम्पत्याच्याबाबत पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत. ते योग्य चौकशी करूनच दाखल केले असतील. पोलिसांकडे असलेल्या माहितीनुसारच योग्य ती कारवाई करतात. त्यामुळे राणा दाम्पत्यावर केलेली कारवाई योग्यच आहे. 

राणा दाम्पत्याच्या घरावर धावून जाणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. 

हे सरकार स्थापन झाल्यापासून, ते पाडण्यासाठी भाजपचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. सध्या सुरू असलेली प्रकरणं त्याचाच एक भाग आहे. असेही वळसे पाटील यांनी म्हटले.

किरीट सोमय्या यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नव्हते. खरंतर कस्टडीमध्ये असलेल्या लोकांना भेटण्यासाठी फक्त वकील आणि नातेवाईकांना परवानगी असते.  त्यामुळे तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढला. झालं ते वाईटचं झालं. असे वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

राणा दाम्पत्याच्या या कृतीमागे, मोठी शक्ती कार्यरत आहे. त्याशिवाय ते हे काम करू शकत नाही. अशी शक्यताही वळसे पाटील यांनी व्यक्त केली.