महाआघाडीला जिन्नावादी सरकार आणायचंय- किरीट सोमय्यांचा आरोप

शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिन्नानावादी सरकार आणायचं असल्याचा आरोप 

Updated: Jan 22, 2020, 09:35 PM IST
महाआघाडीला जिन्नावादी सरकार आणायचंय- किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिन्नानावादी सरकार आणायचं असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळ सीएएविरोधातील आंदोलनादरम्यान फ्री काश्मीरचं पोस्टर झळकावल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबई पोलिसांनी हा गुन्हा रद्द करण्याची तयारी सुरू केलीय. मेहक प्रभू नावाच्या तरुणीनं हे पोस्टर झळकावलं होतं. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच चौकशीही सुरू करण्यात आली होती. 

मात्र गृहमंत्री अनिल देशमुखांना या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. आता हा गुन्हाच रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.