खूपच रंजक आहे 'ताज हॉटेल' उभारण्याची कहाणी, भारताच्या अपमानानंतर असं उभारलं गेलं 'द बेस्ट ब्रँड' हॉटेल

ताज हॉटेल्स हे जगातील प्रसिद्ध हॉटेल ब्रँडपैकी एक आहे. येथे जाणे ही लोकांसाठी अभिमानाची बाब आहे.

Updated: Jul 12, 2022, 10:21 PM IST
खूपच रंजक आहे 'ताज हॉटेल' उभारण्याची कहाणी, भारताच्या अपमानानंतर असं उभारलं गेलं 'द बेस्ट ब्रँड' हॉटेल title=

मुंबई : ताज हॉटेल्स हे जगातील प्रसिद्ध हॉटेल ब्रँडपैकी एक आहे. येथे जाणे ही लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. केवळ देशातीलच नाही तर परदेशी प्रवाशी देखील ताज हॉटेलमध्ये राहणे पसंत करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, या हॉटेलच्या बांधकामामागे एक अतिशय रंजक कथा आहे. ही कहाणी आहे एका भारतीयाच्या अपमानाची, ज्यानंतर त्याने हा हॉटेल उभं केलं, जे आता देशात आणि देशाबाहेर देखील प्रसिद्ध आहे.

टाटा ग्रुप्सचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी परदेशात स्वतःच्या आणि भारताच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ताज हॉटेल बांधले.

खरे तर एकदा जमशेदजी टाटा ब्रिटनला गेले होते. तिथे त्यांच्या एका परदेशी मित्राने त्यांना एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. जमशेटजी टाटा तिथे पोहोचल्यावर त्यांना हॉटेल मॅनेजरने त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यांनी हॉटेलच्या गेटवरच त्यांना थांबवले आणि सांगितले की, भारतीयांना आत ऐन्ट्री दिली जाणार नाह.

आम्ही भारतीयांना हॉटेलमध्ये येऊ देत नाही. ही गोष्ट जमशेटजींच्या हृदयाला भिडली. त्यांना हा स्वतःचा आणि देशाचा अपमान वाटला. ज्यानंतर त्यांनी असा हॉटेल बनवण्याचा विचार केला, ज्यामध्ये भारतीयच काय तर परदेशी लोकांना देखील आत येण्यापासून कोणीही थांबणार नाही.

ब्रिटनमधून परत आल्यानंतर जमशेदजी टाटा यांनी मुंबईत गेटवे ऑफ इंडियासमोर पहिल्या ताज हॉटेलचे बांधकाम सुरू केले. हे हॉटेल 1903 मध्ये बांधण्यात आले होते. हे समुद्राच्या अगदी समोर वसलेले आहे आणि आज जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.

आज ताज हॉटेल हा जगातील एक ब्रँड बनला आहे. अलीकडेच याने नवीन शीर्षक देखील ठेवले आहे. ब्रँड फायनान्सच्या 'Hotels-50 2021' अहवालानुसार, Taj Hotels ला जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड घोषित करण्यात आले आहे. याच अहवालानुसार, ताज हॉटेलने कोरोना महामारीच्या काळात समोर आलेल्या कठीण आव्हानांचा जोरदार सामना केला. या कारणास्तव, हे सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत शीर्षस्थानी ठेवले गेले आहे.