close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल, मुंबईत चार ठिकाणी कलम १४४ लागू

मुंबई पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम १४४ लागू केलंय 

Updated: Aug 22, 2019, 01:10 PM IST
राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल, मुंबईत चार ठिकाणी कलम १४४ लागू

मुंबई : कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ईडी कार्यालयात चौकशी सुरु झालीय. राज ठाकरेंना ईडीकडून आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार राज ठाकरे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानातून निघाले. जवळपास अर्धा ते पाऊणतासात ते ईडीच्या कार्यालयात पोहचले. यादरम्यान राज यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित, मुलगी शर्मिला आणि सून मिताली असा सगळा परिवार उपस्थित आहे. राज ठाकरे यांना एकट्याला ईडी ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर ईडीच्या कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले. 

दरम्यान, मुंबई पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम १४४ लागू केलंय. यामध्ये मरीन ड्राईव्ह, एमआरए मार्ग पोलीस, आझाद मैदान, दादर पोलीस स्टेशन या भागांचा समावेश आहे.  

 

'कोहिनूर' महागात! ईडी चौकशी करत असलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

कोहिनूर स्क्वेअर गैरव्यवहार : ईडी चौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरेंना पत्नी, मुलाचाही साथ